इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

आपघात : जीव वाचला : हातावरुन गेले

अंबाजोगाई बसस्थानका समोर पादचार्‍याने मारली उडी

बसचे टायर गेल्याने हाताचा चुराडा

अंबाजोगाई - उदगीरहून छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी उदगीर आगाराची बस बसस्थानकामध्ये जात असताना रस्त्याने चालत असलेल्या पादचार्‍याने एसटी समोर उडी मारली. चालकाच्या प्रसंगाधवनामुळे पादचार्‍याच्या हातावरून टायर गेल्याने हाताचा पुर्ण चुराडा झाला. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकासमोर घडली.

उदगीर- छत्रपती संभाजीनगर (एम.एच.20.बी.एल.3824) क्रमांकाची बस छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. अंबाजोगाईच्या बसस्थानकामध्ये वळत असताना धुराजी बालाजी साळवे, रा.अंबाजोगाई (वय 29) याने बससमोर उडी मारली. चालकाच्या लक्षात आल्याने त्याने ब्रेक मारला परंतु डाव्या बाजूचे टायर त्याच्या हातावरून गेल्यामुळे हाताचा तुकडा पडला. चालकाच्या प्रसंगधावनामुळे त्याच्या अंगावरून गाडी जाण्याची वाचविली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई आगाराच्या वतीने व शहर पोलिसांच्या वतीने पंचनामा करून जखमीला स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट