इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

स्वातंत्र्य दिन

 स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतमाता  पुजन आणि  देशभक्तीगीत कार्यक्रम उत्साहात 




परळी, (प्रतिनिधी) :- मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत परळीत यंदाही  विक्रम चहाकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त राणी लक्ष्मीबाई चौकात दि १५ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन राजस्थानी पत संस्था चे अध्यक्ष श्री चंदुलालजी बियाणी यांच्या हस्ते करून, परळीतील स्त्री आणि पुरुष आवाजाची आशीर्वाद प्राप्त झालेला परळीतील युवक श्रावण आदोडे साक्षात   गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्या वेषभुषेत         *गीतों में गुंजे आजादी का जश्न*  देशभक्ती गीत सादर केले 

           दरवर्षी स्वातंत्र्य दिन राणी लक्ष्मीबाई चौकात जिलेबी वाटून साजरा केला जातो . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाळ कंकाळ, विरभद्र जवादे,उमेश म्हैतरजकर,मित्र परिवार आणि समाज बांधवांनी सहकार्य केले त्याबद्दल विक्रम चहाचे वितरक संजय सेवलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या