बंसल क्लासेसच्या बहुचर्चित बूस्ट परीक्षेची घोषणा

 कोट्यावधींची शिष्यवृत्ती व लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव करणाऱ्या; बंसल क्लासेसच्या बहुचर्चित बूस्ट परीक्षेची घोषणा

पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी यांची जयंती व बंसल क्लासेसच्या द्वितीय वर्धापनदिनाचे औचित्य  

परळी - दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी यांची जयंती व बंसल क्लासेस महाराष्ट्राच्या द्वितीय वर्धापनदिनाचे (ता.१९) औचित्य साधून, बंसल क्लासेसच्या वतीने बूस्ट (बंसल ओपन ऑपॉर्चूनिटी स्कॉलरशिप टेस्ट) या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. कोटा, राजस्थान येथील सुविख्यात बंसल क्लासेस महाराष्ट्रात देखील २ वर्षांपासून यशस्वी निकालांची आपली परंपरा कायम राखत आहेत. सदर शैक्षणिक सेवा अधिक उंचीवर नेण्यासाठी व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी बूस्ट या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबर आणि १७ डिसेंबर अशा तीन टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सदर परीक्षा घेण्यात येणार आहे.

बूस्ट परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवण्याच्या स्वप्नाला बळकटी दिली जाते. उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा योग्यता पडताळणीचे खात्रीशीर व्यासपीठ आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून, बंसल क्लासेस वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी १००% पर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करते. सोबतच विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसेसुद्धा या परीक्षेअंती जिंकण्याची संधी मिळते. या बूस्ट परीक्षेसोबतच डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सिरिज अशा आणखी दोन परिक्षा सुध्दा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थांना भविष्यात विविध परीक्षांना सामोरे जाण्यासाठी या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून फायदा व्हावा या अनुषंगाने बंसल क्लासेसच्या वतीने या परिक्षांची बांधणी करण्यात आली आहे. या टेस्ट सिरिजमध्ये ४ युनिट टेस्ट व १० मॉक टेस्टचा समावेश असणार आहे.

विविध प्रांतात आपल्या कार्याचा प्रभावी ठसा उमटवणाऱ्या बियाणी उद्योग समुहाचा आणखी एक महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे जागतिक दर्जाच्या फिनलँड एज्युकेशन पद्धतीवर आधारित क्युरिअस किड्स प्ले एज्यूकेशन सेंटर, त्याच्या फ्रेंचाइजी वाटपाची घोषणा सुध्दा आजच्या दिवशी करण्यात आली. क्युरिअस किड्स हा शैक्षणिक अभ्यासक्रम आपल्या बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम आहे. तसेच क्युरिअस किड्सच्या माध्यमातून युवक-युवतींना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊन, या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना फ्रेंचाइजी घेण्याची संधी देखील मिळणार आहे. कमी गुंतवणूक आणि अधिक लाभ या धर्तीवर हे फ्रेंचाइजी देण्यात येणार आहे. सर्व स्तरावर उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्याच्या हेतूने दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या भागात देखील क्युरिअस किड्सच्या फ्रेंचाइजी देण्यात येणार आहे.

कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्तीसोबतच लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

बूस्ट परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता दहावीतून अकरावी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच राज्यातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस कार, द्वितीय क्रमांकासाठी बुलेट बाइक तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस आय-पॅड प्रदान करण्यात येईल. विशेष म्हणजे राज्यपातळीवरील बक्षिसांसोबतच विभाग निहाय व जिल्हानियाह देखील बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात विभागस्तरावर प्रथम येणाऱ्यास दुचाकी गाडी तर द्वितीय क्रमांकासाठी लॅपटॉप, तृतीय क्रमांकासाठी टॅब देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकावरील विद्यार्थ्यांस अँन्ड्रॉईड फोन, द्वितीय क्रमांकासाठी टॅब तर तृतीय क्रमांकासाठी स्मार्ट वॉच प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.


इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पडताळणीसोबतच गुणवत्ता बूस्ट करण्याची संधी

सलग २ वर्षे महाराष्ट्रात देखील उज्ज्वल निकालांची परंपरा कायम राखण्यात बंसल क्लासेसला यश प्राप्त झाले आहे. नीट व जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी देणे आणि शास्त्रशुद्ध शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे तसेच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या प्रक्रियेत होणाऱ्या बदलांनुसार मार्गदर्शनातसुद्धा वेळोवेळी आवश्यक ते बदल घडवून आणणे आणि त्यानुसार क्लासेसच्या अभ्यासक्रमाची व अध्यायनाची बांधणी करणे  ही बंसल क्लासेसची विशेषता राहिली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बूस्ट या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून आपली शैक्षणिक गुणवत्ता पडताळून ती अधिक बूस्ट करून घ्यावी.

- चंदुलाल बियाणी, मुख्य प्रवर्तक, बंसल क्लासेस, महाराष्ट्र

..........





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !