इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

सार्वजनिक ठिकाणांच्या प्रांगणातील झाडांना संरक्षित केले पाहिजे

 उपजिल्हा रुग्णालय प्रांगणातील जुने झाड उन्मळून  पडले !


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
        परळीच्या उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात असलेले जुने एक झाड आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उन्मळून पडल्याची घटना घडली. या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. गाड्याही पार्क केलेल्या असतात. दरम्यान हे झाड उन्मळून पडले परंतु सुदैवाने कोणती हानी झाली नाही.
         परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात असलेले एक जुने झाड आज अचानकच उन्मळून पडले आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून या भीज पावसामुळे जमीन ओलसर झालेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे बहुदा या झाडाच्या मुळ्या ढील्ल्या झाल्या असण्याची शक्यता असुन आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हे झाड उन्मळून पडले आहे. उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी वसाहत, जिल्हा परिषद मुलांची शाळा व उपजिल्हा रुग्णालय प्रांगणात नेहमीच नागरिकांची ये -जा असते . या ठिकाणी वाहने पार्क केली जातात. हे झाडून उन्मळून एका गाडीवर पडले. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रांगणातील झाडांना संरक्षित केले पाहिजे हा मुद्दा यामुळे समोर आला आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या