सत्कार

 चंद्रपूरचे मुख्य दिवाणी न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांचा परळीत लावण्याई पब्लिक स्कूल तर्फे सत्कार 



..............

परळी वैजनाथ दि  18  ( प्रतिनिधी)

अंबाजोगाई येथील भूमिपुत्र तथा चंद्रपूरचे दिवाणी न्यायाधीश प्रशांत प्रभाकरराव कुलकर्णी यांनी परळी शहरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या प्रभू वैद्यनाथाचे श्रावण महिन्याच्या शुभारंभाचे औचित्य साधून दर्शन घेतले. तसेच परळीतील लावण्याई पब्लिक स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचे अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी यांनी प्रशांत कुलकर्णी यांचा यथोचित सत्कार केला. परळी येथील वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेतल्यानंतर परळीचे माजी नगराध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते बाजीराव भैया धर्माधिकारी यांनीही त्यांचा सत्कार केला. लावण्यई पब्लिक स्कूल मध्ये चिमुकल्या मुलांनी त्यांचे स्वागत करून ते न्यायाधीश कसे झाले हे जाणून घेतले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी म्हणाले," विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी छंद जोपासून अभ्यास केला पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा ई. स्पर्धामध्ये भाग घेऊन आपले व्यक्तिमत्व विकसित केले पाहिजे. असे ते म्हणाले.

यावेळी शाळेच्या प्राचार्य कविता  विर्धै   संघमिञा  पोटभरे  प्रतिक्षा कुलथे  नम्रता  पांडे  सुषमा  देशमुख सोहल सर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !