दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

देवदर्शनासह जनता जनार्दनाचे दर्शन घेऊ- पंकजा मुंडे

 पंकजा मुंडे करणार राज्यात शिव - शक्ती दर्शन दौरा !


राज्यातील ज्योतिर्लिंग व शक्तीपीठांच्या देवदर्शनासह जनता जनार्दनाचे दर्शन घेऊ- पंकजा मुंडे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

            राजकारणापासून दोन महिन्याची सुट्टी जाहीर करून राजकीय वातावरणापासून काहीशा दूर असलेल्या भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गेल्या सोमवारी एक व्हिडिओ करुन लवकरच आपण जनता जनार्दनाचेही दर्शन घेण्यासाठी व भेटण्यासाठी येणार असल्याचे  सुतोवाच केले होते.त्यानंतर आज (दि.28) रोजी पुन्हा एक व्हिडिओ करुन  राज्यात शिव - शक्ती दर्शन दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.


           सध्याच्या राजकीय परिस्थितीत आपण दोन महिन्याच्या सुट्टीवर जात असल्याचे जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडे या राजकीय वातावरणापासून काहीशा दूर आहेत .मात्र त्यांच्या समाज माध्यमांमधून त्या लोकांशी सातत्याने संवाद साधत आहेतच. या दरम्यान गेल्या श्रावण सोमवार निमित्ताने पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ करुन  लवकरच आपण जनताजनार्दनाचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याचे म्हटले होते.  त्यानंतर आज त्यांनी आणखी एक व्हिडिओ समाजमाध्यमांत शेअर केला आहे.यामधून आपण राज्यात शिव - शक्ती दर्शन दौरा लवकरच करणार असल्याचे म्हटले आहे. या दौऱ्यात राज्यातील ज्योतिर्लिंग व शक्तीपीठांच्या देवदर्शनासह जनता जनार्दनाचे दर्शन घेऊन लोकांना भेटणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....