अबकी बार..............!

 लोकसभेसाठी भाजपचे घोषवाक्य ठरलं!; 'तिसरी बार मोदी सरकार', अबकी बार 400 पार'



भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवे घोषवाक्य तयार केले आहे. या निवडणुकीत भाजप 'तिसरी बार मोदी सरकार', अबकी बार 400 पार', असा नारा देणार आहे. आज (दि. २) दिल्लीत भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत याबाबत घोषणा करण्यात आली. 



भाजपने राज्य, लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील संयोजक आणि सहसंयोजकही निश्चित केले आहे. या निवडणुकीत भाजप महिला मतदार आणि तरुणांवर भर देणार आहे. प्रथमच मतदानासाठी जाणाऱ्या अशा मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. भाजप सोशल मीडियावरील प्रचारालाही गती देणार आहे. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच संपूर्ण भारताचा दौरा करणार आहेत. यासोबतच गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेही वेगवेगळ्या वेळी देशाच्या विविध भागांना भेटी देणार आहेत. 22 जानेवारीनंतरही पंतप्रधानांचा हा दौरा सुरू होणार आहे.

•••






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !