इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर निघणार तोडगा ?

 शरद पवार - पंकजा मुंडे यांच्यात ४ जानेवारीला शिर्डीत बैठक

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर निघणार तोडगा ?


बीड ।दिनांक ०२।

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या लवादाची बैठक ४ जानेवारीला शिर्डीत होत आहे. या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


Click:● *परळी वैजनाथचा बहुमान; मानाचे निमंत्रण: अयोध्येतील ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा: मुख्य कार्यक्रमात विधीचार्यां समवेत उपस्थित राहणार परळीतील 'हे' वेदमुर्ती*


   ऊसतोड कामगारांच्या  मजुरीत दरवाढ करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील ऊसतोड कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर साखर संघ आणि कामगार संघटनांची नुकतीच बैठक झाली होती. कामगारांच्या मजूरीत २९ टक्के दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली आहे तर ही दरवाढ ४० टक्के असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम राहिल्या आहेत, त्यामुळे यावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. ५ जानेवारीपर्यंत तोडगा न निघाल्यास कोयता बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे.


पवार- मुंडे लवादाची शिर्डीत बैठक

-----------

 दरम्यान, मजूरांच्या दरवाढीचा  अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजाताई मुंडे यांच्या लवादाने घ्यावा यावर  साखर संघ व ऊसतोड मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं होतं, त्या अनुषंगाने येत्या गुरूवारी ४ जानेवारी रोजी शिर्डी येथे पवार-मुंडे लवादाची बैठक होणार आहे.  या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत  ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय होण्याची  शक्यता आहे.

••••





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या