प्रकाश अण्णा शेंडगे , प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्यासह ओबीसी नेते करणार मार्गदर्शन!!

 ओबीसी बहुजन पार्टी - मराठवाडा विभाग प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा!


प्रकाश अण्णा शेंडगे , प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्यासह ओबीसी नेते करणार मार्गदर्शन!!


परळी वैजनाथ - प्रतिनिधी : ओबीसी बहुजन पार्टी, महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभागीय मेळाव्याचे परळीत 25 जुलै रोजी सकाळी ठीक 11 वाजता *श्रद्धा मंगल कार्यालय* येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात मराठवाड्यातील पक्ष बांधणीसाठी जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला ओबीसीचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी बहुजन पार्टीचे दक्षिण मराठवाडा अध्यक्ष मा. श्री. भीमराव मुंडे, जिल्हाध्यक्ष मा. श्री.विनायकराव गडदे आणि तालुकाध्यक्ष मा. श्री. सूर्यकांत मुंडे यांनी केले आहे. 


   हा मेळावा दोन सत्रामध्ये संपन्न होणार असून पहिले सत्र सकाळी 11 ते दुपारी 2 व भोजनानंतर दुसरे सत्र दुपारी 3 ते सायं. 5:30 पर्यंत चालणार आहे. या सत्रामध्ये प्रमुख ओबीसी नेते मार्गदर्शन करणार आहेत. 


या मेळाव्याला ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर,  ज्ञानेश्वर गोरे, राष्ट्रीय महासचिव  चंद्रकांत बावकर,  राष्ट्रीय कोषाध्यक्ष जे.डी. तांडेल, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य उचल्याकार मा. प्रा. लक्ष्मण गायकवाड,  मच्छिंद्र भोसले, हरिभाऊ शेळके मामा,  रफिकभाई कुरेशी, अँड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, उत्तर मराठवाडा अध्यक्ष  डॉ. भोजने साहेब आदी ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत.

तरी मराठवाड्यातील प्रमुख ओबीसी नेते व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार