कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - भाजपाचे आवाहन

आ. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - भाजपाचे आवाहन


परळी वैजनाथ 

      भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना भाजपच्या सर्व प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला आघाडी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी शहर व तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

     भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, विधान परिषदेच्या आमदार पंकजाताई मुंडे यांचा उद्या शुक्रवार दि. 26 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. पंकजाताई मुंडे यांना राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी निरोगी, दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता बारा ज्योतर्लिंगांपैकी एक आसलेल्या प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करण्यात येणार आहे तर सकाळी 9 वाजता मलिकपुरा येथील दर्ग्यास चादर चादर चढविण्यात येणार आहे. त्यानतंर सकाळी 10 वाजता उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांना भाजपच्या सर्व प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला आघाडी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी शहर व तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !