युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात घेतला आढावा

 कृषी पूरक साहित्याचे वितरण शेतकऱ्यांना ताबडतोब करावे - कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात घेतला आढावा


मुंबई दि ८ ऑगस्ट २०२४-

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले पॉवर स्प्रे पंप शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तसेच राज्यातील पूरबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नुसानभरपाई देण्याच्या अनुषंगाने नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे, तसेच विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यात ताबडतोब वर्ग करण्यात यावा असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले.


कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती व्ही राधा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प संचालक  परिमल सिंह, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी विकास प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, कृषी संचालक विनायकुमार आवटे, सर्व विभागीय कृषी सहसंचालक, सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा व इतर अधिकारी उपस्थित होते. 


बैठकीत बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यात 99 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा माध्यमातून डीबीटी पोर्टल वर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाचे कृषी पूरक उपकरणे, निविष्ठा यांचे वितरण त्वरित करण्यात यावे. नॅनो युरिया, डीएपी, पावर स्प्रे पंप, स्टोरेज बॅग, मेटल दिहाईड आदी साहित्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे, असे निर्देश दिले तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भासणाऱ्या अडचणींच्या बाबत आढावा घेण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या