इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री !

मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर


पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.

गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे - अजित पवार
बीड - अजित पवार

जालना - पंकजा मुंडे

अमरावती - चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम - हसन मुश्रीफ
सांगली - चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाट
जळगाव - गुलाबराव पाटील
यवतमाळ - संजय राठोड
कोल्हापूर - प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला - आकाश फुंडकर
भंडारा - संजय सावकारे
> बुलढाणा - मंकरंद जाधव
> चंद्रपूर - अशोक ऊईके
> धाराशीव - प्रताप सरनाईक
> धुळे - जयकुमार रावल
> गोंदिया - बाबासाहेब पाटील
> हिंगोली - नरहरी झिरवळ
> लातूर - शिवेंद्रसिंग भोसले
> मुंबई शहर - एकनाथ शिंदे
> मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा/
> नांदेड - अतुल सावे
> नंदुरबार - मानिकराव कोकाटे
> नाशिक -  गिरीश महाजन
> पालघर - गणेश नाईक
> परभणी - मेघना बोर्डीकर
> रायगड - अदिती तटकरे
> सिंधुदुर्ग- नितेश राणे
> रत्नागिरी - उदय सामंत
> सोलापूर - जयकुमार गोरे
> वर्धा - पंकज भोयर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या