इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ: दिव्यांग व्यक्ती चढून बसला शंभर फूट उंच पाण्याच्या टाकीवर!

केज.....

    मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची संपूर्ण राज्यभर चर्चा असुन आवादा कंपनीच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले व मकोकांतर्गत गुन्ह्यात समावेश करण्यात आलेले वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ परळी सह बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होत असताना आता केज तालुक्यातच 100 फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर एक दिव्यांग व्यक्ती सकाळपासून जाऊन बसला आहे. वाल्मीक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी त्याने केली आहे. त्याला खाली उतरविण्यासाठी पोलीस त्याची मनधरणी करत आहेत.

      केज तालुक्यातील नाव्होली येथे नानासाहेब भानुदास चौरे नावाचा एक हात आणि पायाने अपंग असलेला दिव्यांग तरुण १०० फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढला आहे. वाल्मीक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची त्याची मागणी आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पोहोचले असून त्यांच्याशी ते संपर्क साधून त्याला खाली उतरविण्यासाठी त्याची मनधरणी करण्यात येत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या