इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 महिला महाविद्यालयात स्मृतिसमारोहाचे भव्य आयोजन

 अरविंद जगताप यांचे व्याख्यान व निमंत्रितांचे कविसंमेलन 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी )

       येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांचा स्मृतिसमारोह सोहळा  दि . ३० व ३१ जानेवारी रोजी आयोजित करत आहोत . प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आनंदविभोर करणाऱ्या अशा कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. 

       गुरुवार दि . ३० जानेवारी रोजी या सोहळ्याचे उद्‌घाटन सकाळी ११ वा. मा. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होईल.तर दि ३० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ .०० वा . परळीकरांच्या आनंदाला उधाण आणणारे  ' *निमंत्रितांचे कविसंमेलन* ' संपन्न होणार आहे.त्यात श्री प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) , मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई ) , अरुण पवार (परळी वैजनाथ ) , गोपाल मापारी (अकोला) व दिवाकर जोशी (परळी वैजनाथ) हे महाराष्ट्रातील मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.हास्याचे फवारे उडवतानाच मनाला मोहविणाऱ्या गेय व आशयसंपन्न अशा कवितांचे आविष्करण यावेळी रसिकश्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे.


       दि . ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते , चित्रपट पटकथाकार,गीतकार मा. अरविंद जगताप यांचे *'गोष्ट छोटी डोंगराएवढी* 'या विषयावर  खुमासदार विनोदी शैलीत जीवन उपयोगी असे व्याख्यान ऐकायला मिळणार आहे.

    .   वास्तविक डांबिस ,गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ,गोष्ट छोटी डोंगराएवढी ,कोण आहे रे तिकडे ,बापरे बाप ,खुर्ची सम्राट ,गुलदस्ता , जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा , तीन बायका फजिती ऐका ,प्यार वाली लव स्टोरी , तुहीरे , पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा ,गड्या आपला गाव बरा ,अडगुला मडगुला अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ मराठीतील  चित्रपटाच्या पटकथा व असंख्य मराठी गाणी लिहिणारे अरविंद जगताप यांना या व्याख्यानाच्या माध्यमातून ऐकायला मिळणं ही परळीकर रसिकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे.संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. अनिलराव देशमुख ,अध्यक्ष संजयजी देशमुख सचिव रविंद्रजी देशमुख ,कोषाध्यक्ष प्रसादजी देशमुख ,प्राचार्या तथा संचालिका डॉ.विद्या देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार या तिन्ही कार्यक्रमाचे नेटके नियोजन आयोजन समिती करत आहे.तरी या कार्यक्रमास परळी पंचक्रोशीतील बहुसंख्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.अरुण चव्हाण , प्रा.डॉ. पंढरीनाथ गुट्टे, प्रा.डॉ.संगीता कचरे,प्रा.डॉ.विद्या गुळभिले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या