खळबळजनक: ऊसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार ; दुष्कृत्याचं केलं व्हिडिओ चित्रीकरण 

कडा :- पोटाची खळगी भरण्यासाठी परिस्थिती हातातील पुस्तकसुध्दा बाजूला सारून आई वडिलांसोबत कामाच्या ठिकाणी जावे लागते.कधीकधी आपल्या वाईट परिस्थितीचा गैरफायदा घेणारे नराधम आपल्या आजूबाजूला असतात.असाच एक संतापजनक प्रकार सांगली जिल्ह्यातील क्रांती साखर कारखाना वर घडला आहे.आई-वडिलांसोबत ऊस तोडीसाठी गेलेल्या ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.पीडित मुलीनं ४ दिवस उलटले तरी याबाबत कोणाला काही सांगितलं नाही.जीवे मारण्याचा धमकी ने म्हणा किंवा जगायचं कसं कोणाला बोलायचं बदनामी होईल या सगळ्या भीतीनं पीडित गप्प राहिली. मात्र आई वडिलांनी विश्वासात घेतल्यानंतर या मुलीनं घडलेला सगळा प्रकार सांगितला.क्रांती सहकारी साखर कारखान्यावर भाकरीचा अर्धचंद्र शोधण्यासाठी आई वडिलांसोबत ऊस तोडीला गेलेल्या नऊ वर्षीय मुलीवर टोळी मुकादमाच्याच ट्रॅकटर ड्रायव्हर हरी बबन सानप ता.आष्टी याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रांती कारखाना कुंडल ता. पलूस जिल्हा सांगली येथे पाटोदा तालुक्यातील एका गावची मुलगी ऊस तोडणीसाठी गेली होती.आई वडील ऊसतोडणीसाठी गेल्याचा फायदा घेऊन कोपीवर एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन ऊसतोड ट्रॅक्टर ड्रायव्हर ने मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली.घटना घडून काही दिवसाचा कालावधी लोटला पीडित मुलीने भीतीपोटी या घडलेल्या प्रकाराची वाचता केली नाही.वडिलांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला.या प्रकरणी कुंडल ता.पलूस पोलिसांनी या नराधम आरोप विरोधात ६५(२),३५१(२), ३५१(३)बाल लैंगिक संरक्षण अधिनियम ४,८,१२, १४(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय सोमनाथ वाघ हे करीत आहेत.


◆आरोपीने स्वत च्या मोबाईलमध्ये आपले दुस्कृत्य चित्रण केलेला मोबाईल दुसऱ्या व्यक्तीला विकला त्यामुळे या गुन्ह्याचा उलगडा झाला व आरोपीच्या मुसक्या अवळण्यास मदत झाली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार