संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

लग्नाचे आमिष दाखवून पाच महिने अत्याचार; एका युवकाविरोधात गुन्हा

परळी (प्रतिनिधी)

 लग्नाचे आमिष दाखवुन व मोबाईलमध्ये असलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत साडेसोळा वर्षाच्या मुलीवर पाच महिने बलात्कार केल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 परळी शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी एका युवकाने  १६ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत व माझ्याकडे तुझे फोटो असुन ते आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ऑगस्ट २०२४ ते २४ जानेवारी २०२५ या काळात सतत बलात्कार केला.याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दि.१० मार्च रोजी संभाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज रामकिसन कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जाधवर हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....