नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

शेतकरी विरोधी कृषी कराराची परळीत प्रतिकात्मक होळी



परळी /प्रतिनिधीः 

     अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याने बीड किसान सभेकडून या कराराची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. परळी तालुक्यातील कावळेवाडी, बोधेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत या कराराचा तीव्र निषेध केला.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे आयोजित महा एक्स्पो २०२६ पशुप्रदर्शनात भारत-अमेरिका व्यापार कराराचे स्वागत करत अमेरिकेची मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली झाल्याचे सांगितले होते. या निषेधार्थ किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देत परळी तालुक्यातील कावळेवाडी, बोधेगाव या ठिकाणी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी मंगळवार दि 17 रोजी एकत्र येत या कराराची प्रतिकात्मक होळी केली. सोयाबीन, इथेनॉल, जीएम सोयाबीनपासून तयार खाद्यतेल, पशुखाद्य, सुकामेवा, फळे-भाज्या व पोल्ट्री उत्पादनांवरील सवलतीमुळे भारतीय बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. सोयाबीनचा हमीभाव ५३३० रुपये असताना शेतकऱ्यांना सुमारे साडेतीन हजार रुपयांत विक्री करावी लागत असल्याचे सांगत भावांतर योजनेतून नुकसानभरपाई देणार का, असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या