आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा रंगणार जल्लोष...

इमेज
  सिरसाळा येथे बुद्धरूप अनावरण व बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन ना. संजय शिरसाट,ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री  आ.धनंजय मुंडे व डॉ. हर्षवर्धन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रविवार दि. २४ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपाचे अनावरण तसेच सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. सम्राट अशोक बुद्ध विहार, कुशी नगर, सिरसाळा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास विविध मान्यवर, भन्तेजी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून होणार असून पूज्य भन्ते डॉ. धम्मप्रिय महास्थवीर (अध्यक्ष, भीम जन्मभूमी महू, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते हा विधी पार पडणा...

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४ अंतर्गत निधी मंजूर; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

 खा.बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश




गेवराई तालुक्यातील 'एमडीआर-२० ते यमगरवाडी' रस्ता कामाला मंजुरी!

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४ अंतर्गत निधी मंजूर; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण 

बीड: गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा आणि दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तालुकयातील L021 एमडीआर-२० ते यमगरवाडी या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४' (PMGSY-IV) अंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. बीडचे खा. बजरंग सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांना यामुळे मोठे यश आले असून, या रस्त्यासाठी १ कोटी ३७ लक्ष २९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने (नवी दिल्ली) १८ मे २०२६ रोजी या कामाला अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी अडचण दूर होणार आहे. 

गेवराई तालुक्यातील एमडीआर-२० ते यमगरवाडी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेण्यासाठी, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण व्हावे, अशी आग्रही मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात होती.ग्रामस्थांची हीच गरज ओळखून खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्ली दरबारी आणि संबंधित मंत्रालयाकडे या रस्त्याच्या मंजुरीसाठी विशेष पाठपुरावा केला होता. अखेर काल, १८ मे रोजी केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने या कामावर मंजुरीची मोहोर उमटवली. या एकूण १.४०० कि.मी. अंतराच्या रस्त्याचे काम आता पूर्णपणे दर्जेदार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणार आहे.


" ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर तिथले रस्ते सक्षम असणे गरजेचे आहे. यमगरवाडी रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. यासाठी मी वैयक्तिक पातळीवर सातत्याने केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा करत होतो. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, १३७.२९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील एकही गाव रस्त्याविना वंचित राहणार नाही, यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. "

      -खा. बजरंग सोनवणे, बीड लोकसभा.

ग्रामस्थांकडून जल्लोष आणि आभार

या रस्त्याला मंजुरी मिळाल्याची बातमी समजताच यमगरवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक वर्षांचा रखडलेला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल गावकऱ्यांनी खा.बजरंग सोनवणे यांचे विशेष आभार मानले आहेत. रस्ता मंजुरीमुळे आता या भागातील वाहतूक सुसाट होणार असून, परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. या कामाचे भूमिपूजन लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या