नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...
परळीत जीवघेणा हल्ला; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात महिला किराणा दुकानदारावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरन्नुम बेगम इब्राहिम खान (वय ४०, रा. आझादनगर, परळी) यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास कुरेशी मशिदीजवळील त्यांच्या किराणा दुकानासमोर ही घटना घडली. यावेळी उमर मेहबूब शेख, अयान डिंगुल, मेहबूब मौला शेख, रफीक रजाक शेख, अशु(पुर्ण नाव माहीत नाही), अमन मेहबूब शेख, शाजेन नजीर शेख, आयान मेहबूब शेख या आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादीच्या मुलीचा विनयभंग केला.तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलगा व पतीला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३३३, ७४, ११८(१)(२), १९०, १९१(१), ११५(१), ३५१(२), ३५२ तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल टी. शिंदे हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा