धारूर घाटात ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी


धारुर: अपघातासाठी कुप्रसिद्ध झालेल्या धारूर घाटात आज गुरुवारी (दि.२१) रात्री आणखी एक अपघात झाला. ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हनुमंत दराडे (रा. गावंदरा, ता. धारूर) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीं. 

अपघातातील धडक इतकी भीषण होती की, हनुमंत दराडे यांच्या गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार