धर्मप्रेमी नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 परळीत २२ पासून आठवडाभर वेदज्ञानाची मेजवानी

पं. शिवकुमारजी शास्त्री, पं प्रदीपजी आर्य यांची मौलिक प्रवचने 

परळी वैजनाथ , दि.१८-

     मानवी जीवनाचे अध्यात्मिक, सामाजिक, कौटुंबिक कल्याण साधावे या उद्देशाने परळीतील आर्य समाजाच्या वतीने येत्या २२ ऑगस्ट पासून आध्यात्मिक, धार्मिक, राष्ट्रीय व सामाजिक विषयावर मौलिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.  

        महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या मानव जीवन कल्याण आणि वेद प्रचार अभियानांतर्गत येथील आर्य समाजाच्या वतीने ‘श्रावणी वेदप्रचार सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. २२ ऑगस्ट ते शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा सप्ताह विविध धार्मिक, सामाजिक व वैचारिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

या सप्ताहासाठी आर्य जगतातील विद्वानांचे आगमन होणार असून पं. शिवकुमार जी शास्त्री (सहारनपूर, उत्तर प्रदेश) आणि पं. प्रदीप जी आर्य (फरीदाबाद, हरियाणा) हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ५.३० ते ६.३० वाजता यज्ञ, ६.३० ते ७ वाजता भजनोपदेश, सकाळी ७ ते १० वाजता आध्यात्मिक प्रवचन तसेच सकाळी ११ वाजता विविध विद्यालये व महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ८ वाजता भजन, तर रात्री ९ ते १० वाजता सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

विशेष कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी श्रावणी पौर्णिमेनिमित्त सकाळी ७.३० वाजता यज्ञोपवीत (जानवे) परिवर्तन, ८.३० वाजता यज्ञाची पूर्णाहुती तसेच दुपारी ४ वाजता दरवर्षीप्रमाणे सामूहिक संस्कृतदिन समारंभ उत्साहात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ परळी शहर व परिसरातील नागरिकांनी, आर्य समाज बांधवांनी तसेच धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आर्य समाज परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या सफलतेसाठी आर्य समाजाचे प्रधान  जुगलकिशोर लोहिया, मंत्री उ उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष देविदास कावरे, उपप्रधान लक्ष्मण आर्य गुरुजी, डॉ. मधुसूदन काळे,उपमंत्री जयपाल लाहोटी, प्रशांत कुमार शास्त्री, रंगनाथ तिवार, गोवर्धन चाटे यांच्यासह आर्य समाजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार