भावपूर्ण श्रद्धाजली....

 इलेक्ट्रिकल व्यावसायिक धनराजआप्पा नरवणे यांचे निधन

परळी : येथील गांधी मार्केट भागातील प्रसिद्ध इलेक्ट्रिकल व्यावसायिक धनराजआप्पा सांभाप्पा नरवणे (वय ८०) यांचे शुक्रवारी(दि.२१) सकाळी ७.१५ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने नरवणे कुटुंबीयांसह मित्रपरिवार व व्यापारी वर्गावर शोककळा पसरली आहे.

     धनराजआप्पा नरवणे यांनी इलेक्ट्रिकल व्यवसायाच्या माध्यमातून परळी शहरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते ॲड. शशिकांत नरवणे, ऑटोमोबाईल व्यावसायिक मकरंद नरवणे आणि सराफ व्यावसायिक विशाल नरवणे यांचे वडील होत.

त्यांच्यावर आज शुक्रवारी (दि.२१) दुपारी ३ वाजता परळी-गंगाखेड रस्त्यावरील श्री शंभू महादेव मंदिराजवळील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार