श्री जिव्हेश्वर विजय ग्रंथाच्या पारायणास प्रारंभ
परळी वैजनाथ दि.18 (प्रतिनिधी) : भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवा निमित्त आज पासून श्री संत जगमित्र नागा मंदिरामध्ये आज दि.18 ऑगस्ट 2026 ते दि.25 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत सकाळी 8 ते 11 वा. या वेळेत श्री जिव्हेश्वर विजय ग्रंथाचे पारायण होणार आहे. तसेच 11 ते 1 विविध भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती साळी समाजाचे अध्यक्ष बालासाहेब बडकस व श्री जिव्हेश्वर महिला विकास प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सौ. स्वाती ताटे यांनी दिली.
दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी श्री संत जगमित्र नागा मंदिरामध्ये भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव साजरा होणार आहे. तत्पुर्वी आज पासून श्री जिव्हेश्वर विजय ग्रंथाचे पारायण होणार आहे. शनिवार दि.22/08/2026 रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा व दि.23/08/2026 रोजी लहान मुलांसाठी चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी जन्मोत्सव साजरा करून भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे. शिवाय सकाळी 10.30 ते 12.30 पर्यंत ह.भ.प. भरत महाराज सोडगीर यांचे किर्तन होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिला, पुरूष नागरीक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन परळी साळी समाजाचे अध्यक्ष बालासाहेब बडकस, सचिव नितिन भंडारे, विलासराव ताटे, धनंजय आरबुने, अशोक लिखे, नागनाथ कल्याणकर, नारायण मानकर, सचिन पोरे, गंगाधर इंगळे, नारायण ठोंबरे, गणेश गालम, जिव्हेश्वर महिला विकास प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सौ. स्वाती ताटे, सौ. मंजुषा पोरे, सौ. वैजयंती इंगळे, सौ. कल्पना ठोंबरे, सौ. मंजुषा आरबुने, सौ. मिरा घट्टे, सौ. अरूणा भंडारे, श्रीमती सिताबाई भंडारे, सौ. सुनंदा मानकर, सौ. सुरेखा आरबुने, सौ. पद्द्मीन लटंगे, सौ. सारिका आरबुने, सौ. राणी लटंगे, सौ. अंजली पोरे, सौ. सविता लिखे आदनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा