छायाचित्रकार संघटना परळीच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा
परळी वैजनाथ,प्रतिनिधी...
परळीतील छायाचित्रकार संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी9वा. सर्व छायाचित्रकार यांनी जिजामाता उद्यानात एकत्र येऊन महाराष्ट्राचा मानाचा भगवा फेटा बांधून घेतला व सर्वांनी *माता जिजाऊ* यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयघोष केला उद्यानातील शंकर भगवान मूर्ती जवळ फोटोसेशन करून मोटार सायकल रॅलीने *छ. शिवाजी महाराज आण्णाभाऊ साठे, डॉ .बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज* ,या महामानवांना पुष्पहार अर्पण करून रॅलीने सुयोग फोटो वर्ल्ड येथे कार्यक्रम स्थळी एकत्र आले.
या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रवी वळसे यांच्या अध्यक्षतेत गटनेते न.प. वैजनाथराव सोळुंके शिक्षण सभापती योगेश जी मेनकुदळे, ह .भ .प. कोकाटे महाराज या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या तीनही पाहुण्यांनी सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आमच्या माध्यमातून परळीतील छायाचित्रकारांसाठी *छायाचित्रकार भवन* *आर्ट गॅलरी* साठी विशेष प्रयत्न करून एक वर्षाच्या आत ही जागा उपलब्ध होईल पुढील वर्षीचा कार्यक्रम त्याच ठिकाणी होईल असे आश्वासन दिले. पाहुण्यांच्या या प्रतिसादाने छायाचित्रकारांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले, उत्साहात आले आणि भारावले.
ह .भ .प .कोकाटे महाराज मनोगतात आषाढी एकादशीसाठी परळीत होणाऱ्या *संत नामदेव* महाराज पालखीचे रिंगण सोहळ्यासाठी छायाचित्रकारांनी उपस्थिती देऊन फोटो काढून द्यावेत यात स्पर्धा होऊन उत्कृष्ट छायाचित्राला प्रथम 5000 द्वितीय 3000 तृतीय 1500 देण्याची घोषित केले याचेही स्वागत जोरदार टाळ्यांनी छायाचित्रकारांनी केले . तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात द्वादशपंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व छायाचित्रकारांचे उपजीविका साधन यंत्र कॅमेरा याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व पाहुण्यांचे स्वागत शाल ,पुष्पहार व "भारता प्राण तळमळला "या पुस्तकांनी करण्यात आले.
याच कार्यक्रमात सोलापुर येथील विशाल सर यांनी छायाचित्रकारांसाठी कॅमेरा सर्विसिंगचा मोफत कॅम्प ठेवला होता. यासाठी श्रीराम भाले यांनी सहकार्य केले. आणि बहुसंख्य छायाचित्रकारांचा फायदा झाला. हैदराबाद पुणे मुंबईला होणारे काम इथेच करण्यात आर्थिक बचत झाली असा अभिप्राय चित्रकारांनी दिला . हा कार्यक्रम सुयोग फोटो वर्ल्ड यांच्या हॉलमध्ये संपन्न झाला संचालक रवी वळसे यांनी सर्वांसाठी अल्पोपहार आयोजन केले होते पदाधिकारी अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव यांच्या एकसूत्री नियोजनांनी कार्यक्रम खूप छान झाला अशा प्रतिक्रिया पाहुण्यांनी व सर्व छायाचित्रकारांनी व्यक्त केल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण व फोटो रील्सचे काम आकाश गित्ते व गणेश वळसे यांनी केले संघटनेच्या वतीने त्यांचेही स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन छायाचित्र संघटना अध्यक्ष सुनील फुलारी यांनी केले आभार प्रदर्शन सचिव सोमनाथ वळसे यांनी केले सर्वांच्या सहकार्यासाठी उपाध्यक्ष गोविंद विजापुरे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले अल्पोपहार व चहापानानंतर कार्यक्रम समाप्त झाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा