ओंकार शुगर ग्रुप ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित

गोवा : साखर उद्योगाच्या विकासातील उल्लेखनीय योगदान, व्यावसायिक उत्कृष्टता तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याची दखल घेत ओंकार शुगर ग्रुपला ‘Industry Excellence Award’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. गोवा येथे झालेल्या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.

The Sugar Technologists’ Association of India (STAI), नवी दिल्ली यांच्या वतीने STAIच्या ८४व्या वार्षिक अधिवेशन व International Sugar Expo 2026 अंतर्गत १८ ते २० ऑगस्टदरम्यान गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनात साखर उद्योगातील तज्ज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

ओंकार शुगर ग्रुपने साखर उद्योगासोबतच इथेनॉल, बायोएनर्जी, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास या क्षेत्रांवर विशेष भर दिला आहे. उद्योगातील गुणवत्ता, कार्यक्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून समूहाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची विशेष दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली.

दरम्यान, अधिवेशनात साखर उद्योगातील नवीन तंत्रज्ञान, नवकल्पना, ज्ञानाची देवाणघेवाण तसेच भविष्यातील संधी आणि आव्हाने यावर तज्ज्ञांकडून विचारमंथन करण्यात आले. या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे ओंकार शुगर ग्रुपच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली असून, समूहाच्या पुढील वाटचालीस नवी प्रेरणा मिळाली आहे.

या उल्लेखनीय सन्मानाबद्दल ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील, संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांच्यासह समूहातील अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार