उमापूर व बडेवाडी दोन्ही गावातील नारळी सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता, धनंजय मुंडे उपस्थित राहणार
श्री क्षेत्र नारायणगड व श्री क्षेत्र भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगतेस आ. धनंजय मुंडे राहणार उपस्थित उमापूर व बडेवाडी दोन्ही गावातील नारळी सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता, धनंजय मुंडे उपस्थित राहणार परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - श्री क्षेत्र नारायण गड व श्रीक्षेत्र भगवानगड या दोन्हीही आध्यात्मिक गडांच्या नारळी सप्ताहाची आज (ता. ०७) एकाच दिवशी सांगता होणार असून या दोन्ही सप्ताहांना माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत. श्री क्षेत्र नारायण गडाचा पारंपरिक नारळी सप्ताह हा गेवराई तालुक्यातील उमापूर येथे संपन्न होत असून धनंजय मुंडे हे आधी उमापूर येथील या सप्ताहास भेट देऊन श्रीनगर नारायण महाराजांचे व गडाचे महंत प्रेममूर्ती ह. भ. प. श्री शिवाजी महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेतील. श्रीक्षेत्र भगवानगडाचा पारंपारिक नारळी सप्ताह हा पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी गावात संपन्न होत असून उमापूर नंतर धनंजय मुंडे हे बडेवाडी येथील सप्ताहात भेट देऊन ऐश्वर्या संपन्न संत भगवान बाबा व गडाचे महंत न्यायाचार्य ह. भ. प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे दर्शन ...