पोस्ट्स

इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

घोटाळ्याचा तपासाकडे राज्याचे लक्ष !

इमेज
  तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकला आठ दिवसाची पोलीस कोठडी गायब फाईल्स, लॅपटॉप आणि आवाज नमुन्यासाठी मागितली पीसीआर  बीड, प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांच्या भूसंपादन मावेजा वाटप घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महसूल प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या या बहुचर्चित घोटाळ्याच्या तपासाला आता वेग येण्याची चिन्हे आहेत. अविनाश पाठक यांना गुरुवारी बीड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करत गंभीर स्वरूपाची माहिती सादर केली. आरोपीकडून महत्त्वाचा लॅपटॉप जप्त करायचा असून कॉल रेकॉर्डिंग साठी आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच लातूर, पुणे आणि मुंबई येथील आरोपीच्या तीन निवासस्थानी झडती घेण्याची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या घोटाळ्याशी संबंधित १५४ फाईलपैकी १४८ फाईल्स मिळाल्या असून सहा महत्त्वाच्या फाईल्स अद्यापही गायब असल्याचे तपास अ...

मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

परळी तालुका गोर सेनेची राज्यसरकार कडे मागणी

इमेज
  एस.टी.आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने  पाच महिन्यात केलेल्या कामाचा आढावा द्या-परळी तालुका गोर सेनेची राज्यसरकार कडे मागणी परळी , प्रतिनिधी - गेल्या वर्षी गोरबंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण द्या,हैदराबाद गॅझेट लागू करा आदी मागण्यासाठी गोरबंजारा समाजाने महाराष्ट्रभर ५५ महामोर्चे काढले शिवाय गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांनी समृद्धी महामार्गावर हजारो गोर सनिक  उतरवून रास्ता रोको केला व नांदेड रेल्वे रोखण्याचा इशारा दिला होता मात्र राज्यसरकार न सकारात्मक चर्चा करण्यासाठी मुंबई येथे ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व बंजारा समाजातील शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा झाली व एसटी आरक्षणासाठी उच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमण्यात आली मात्र गेल्या पाच महिन्यात समितीन कोणती कामे केली, कोणत्या दिशेने अभ्यास सुरु केला आहे की अजून फक्त कागदापुरतीच समिती सिमित राहिली आहे हे कळत नसल्याने गोरबंजारा समाज आक्रमक झाला असून अभ्यास समितीने पाच महिन्य...
इमेज
पर्यावरणास हानी पोंहचवणारा सरस्वती नदीवरील सिमेंटीकरणाचा प्रस्ताव रद्द करा-सौ.वर्षा जोशी परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातुन वाहत असलेल्या सरस्वती नदीचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या धार्मिक इतिहासात मोठे महत्व असुन या नदीच्या अस्तित्वामुळेच परळीला पाण्यावरची परळी अशी ओळख आहे.परळी नगरपालिकेने या नदीचे क्रॉंक्रिटीकरण करुन अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे.यामुळे धार्मिक ठेवा तर नष्ट होणारच आहे परंतु पर्यावरणाची मोठी हाणी होणार असल्याने हा प्रकल्प रद्द करुन पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावा अशी मागणी भाजपा शहर उपाध्यक्षा सौ.वर्षा जोशी यांनी केली आहे.    याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देत सरस्वती नदीवरील प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.परळी वैजनाथ शहरातुन वाहत असलेल्या सरस्वती नदीमुळे शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यास मोठी मदत होते.या नदीच्या पाण्यामुळे पाणीपातळीसह,तापमानात समतोल राखला जातो.या नदीच्या पाण्यामुळे अंबेवेस, गणेशपार,बरकत नगर,कृष्णा नगर,शिवनगर,इंदिरा नगर,पद्मावती गल्ली,आझाद नगर अशा अर्ध्या परळ...

उद्या दुपारी १ वा. निकाल.....

इमेज
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; उत्सुकता संपली  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी  ८ मे) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती.      या परीक्षेसाठी आठ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, सात लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी आणि १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी...
इमेज
  श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन.. शनिवारी शोभायात्रा परळी वैजनाथ दि.०७ (प्रतिनिधी)         येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार (दि.१०) ते शनिवार (दि.१६) करण्यात आले आहे. तर शनिवारी सायंकाळी सहा वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.          येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह, श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात रविवारी (दि.१०) ते शनिवार (दि.१६) पर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी (दि.१६) संध्याकाळी ७ वाजून ०४ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल, यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा महाप्रसाद शनिमंदिर मध्ये होणार आहे.   त्याचबरोबर ...

#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....