पोस्ट्स

१४ संशयित ताब्यात: संभाजीनगरचे १० संशयित...पाकिस्तानी गॅंगस्टरशी संबंध असल्याचा संशय

इमेज
ATS Raid Marathwada | बीड मधून एकाला उचलले ;छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये एटीएसची एकाचवेळी छापेमारी  पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोग्रा गँगशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी (दि. १०) छत्रपती संभाजीनगरसह बीड आणि जालना येथे एकाचवेळी छापेमारी केली. पहाटेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या धाडीत तब्बल १४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात एटीएसने गेल्या तीन महिन्यांत केलेली ही दुसरी कारवाई असून, एनआयएच्या पथकानेही वाळूज येथे गेल्या महिन्यात अशीच एक कारवाई केली होती. सोशल मीडियाद्वारे हे संशयित शहजाद भट्टी गँगच्या संपर्कात असल्याचा एटीएसला दाट संशय आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून, तो सध्या दुबईत बसून आपली गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे. देशातील तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना कट्टरतावाद आणि हेरगिरीच्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा डाव आहे. त्याच्याशी सोशल मीडियाद्वारे काही तरुण संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघ...
इमेज
औषध घेण्यासाठी रिक्षा थांबवली अन् अज्ञात चोरट्याने लंपास केली १ लाखांची रक्कम  बीड शहरातील बार्शी रोडवरील राजलक्ष्मी मेडिकलसमोरून एका रिक्षातून तब्बल १ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   माणिक दत्तात्रय रांजवण (वय ३६, रा. आहेर वडगाव, ता.जि. बीड) हे त्यांचे मावस भाऊ कृष्णा डरपे यांच्या शिवम ॲग्रो एजन्सी या दुकानात मजुरी काम करतात. त्यांचे मावस भाऊ गावी गेले असल्याने माणिक यांनी दिवसभर दुकान सांभाळले. रात्री आठ वाजेच्या सुमारास दिवसभराच्या खत व बी-बियाणांच्या विक्रीची झालेली १ लाख रुपयांची रोकड एका बॅगेत भरून ते रिक्षाने (क्रमांक MH 23 X 5360) धांडे नगर येथे देण्यासाठी निघाले.   प्रवासादरम्यान बार्शी रोडवरील राजलक्ष्मी मेडिकलसमोर त्यांनी औषध घेण्यासाठी आपली रिक्षा थांबवली आणि ते मेडिकलमध्ये गेले. औषधे घेऊन परत आल्यावर त्यांना रिक्षात ठेवलेली पैशांची आणि टिफिनची बॅग गायब झाल्याचे दिसून आले. आजूबाजूला शोध घेऊनही बॅग न सापडल्या...
इमेज
थरारक : घाटात फिल्मी स्टाईलने कुटुंबाचे अपहरण; पावणेदोन लाखांची लूट, सहाजणांविरुद्ध गुन्हा बीड, ता. १० : मांजरसुंबा घाटात कार अडवून कोयत्याचा धाक दाखवत एका कुटुंबाचे अपहरण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याची अंगठी तसेच एटीएम आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध अपहरण, दरोडा, मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील श्रीपाद गंगाधरराव कुलकर्णी (वय ५०) हे त्यांचे मानस-वडील विजयसिंह रणनवरे आणि मानस-आत्या सुवर्णमाला रणनवरे यांच्यासह कारने वालवड येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. मांजरसुंबा घाट परिसरात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या आरोपींनी त्यांची कार अडवली. उदयसिंह उर्फ सोनू सत्यजितसिंह जाधव (रा. गणेगाव, ता. भूम), अझर सय्यद, निखिल, राहुल काळे (सर्व रा. भूम, जि. धाराशिव) तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी कुलकर्णी यांना कोयत्याचा धाक दाखवत तिघांनाही जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवून अपहरण केल्याचे फिर्यादीत नम...

एक कोटी १० लाखाचा निधी मंजूर ; ग्रामविकास विभागाचा जीआर निर्गमित

इमेज
 ना. पंकजा मुंडेंमुळे परळी तालुक्यातील कौठळी, नंदनज, दौनापूर, डिग्रससह पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत एक कोटी १० लाखाचा निधी मंजूर ; ग्रामविकास विभागाचा जीआर निर्गमित परळी वैजनाथ दि. ०९ राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्यामुळे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत मिळणार असून त्यासाठी एक कोटी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामविकास विभागाने तसा जीआर निर्गमित केला आहे.     ना. पंकजाताई मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत परळी तालुक्यातील ज्या गावांना ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत नाही अशांना स्वतंत्र इमारत द्यावी अशी शिफारस केली होती, त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार कौठळी (२५ लाख) नंदनज (२० लाख) डिग्रस (२० लाख) दौनापूर (२५ लाख) आणि परचुंडी (२० लाख)  या ग्रा.प. ना निधी मंजूर झाला आहे, यातील परचुंडी ग्रामपंचायतीला यापूर्वी इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला असल्याने त्याऐवजी दादाहरी वडगाव ग्रा.पं.सुचविण्यात आली आहे, त्याचे शुध्दीपत्रक लवकरच निर्गमित होणार आहे. दरम्यान गेल्या कित्येक ...

यापुर्वीही घडली होती अशीच घटना...ऑटो प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर!!!

इमेज
खळबळजनक : बँकेतून दीड लाखाची रक्कम काढताच दोन ते तीन जणांनी ऑटोत बसवून महिलेचे परळीतून केले अपहरण परळी वैजनाथ | प्रतिनिधी       परळीतील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून दीड लाख रुपये काढून घराकडे निघालेल्या परळी शहरातील साठेनगर परिसरातील एका महिलेचे अज्ञात दोन ते तीन आरोपींनी अपहरण करून तिला जबरदस्तीने ऑटोरिक्षामध्ये बसवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक बसून दागिने लुटण्याची घटना परळीमध्ये घडली होती या घटनेचीच पुनरावृत्ती आजच्या घटनेने झाली आहे त्यामुळे ऑटो चा प्रवास आणि सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे दरम्यान घडलेली घटना ही  संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दीतील असताना संभाजीनगर व शहर पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही मात्र परळी ग्रामीण पोलिसांनी याबाबतीत तत्परता दाखवत महिलेचा शोध घेतला. ही महिला गंगाखेड येथे मिळून आली आहे.          मिळालेल्या माहितीनुसार, परळी वैजनाथ शहरातील साठेनगर येथील विकी वसंत वाघमारे यांनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांची आई तारा...

हरिहर ऐक्य क्षेत्र परळी वैजनाथ "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषाने दुमदुमले

इमेज
वैद्यनाथ नगरीत वारीचा आनंदसोहळा; संत गजानन महाराज पालखीचे उत्साहात स्वागत हरिहर ऐक्य क्षेत्र परळी वैजनाथ "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषाने दुमदुमले परळी वैजनाथ | प्रतिनिधी वैद्यनाथ नगरीत बुधवारी वारकरी भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याचे परळी शहरात आगमन होताच भाविकांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने स्वागत केले. पालखी आगमनाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवर वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका फडकवत आणि "ज्ञानोबा-तुकाराम" तसेच "गण गण गणात बोते"च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. हरी-हर ऐक्याचे प्रतीक असलेल्या परळी वैजनाथ नगरीत वारकरी संप्रदायाच्या या आगमनाने भक्ती, समता आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करत संत गजानन महाराजांना अभिवादन केले. शहरातील विविध संस्था, नागरिक आणि वारकरी मंडळांच्या वतीने...

✍️ प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख.....

इमेज
प्रबोधनाचा दीपस्तंभ : प्रा. डॉ.बळीराम पांडे यांची राष्ट्रीय वाटचाल एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व केवळ तिच्या पदावर, पुरस्कारांवर किंवा सन्मानांवर मोजले जात नाही; ते तिच्या संघर्षातून, मूल्यनिष्ठ जीवनातून आणि समाजासाठी दिलेल्या योगदानातून अधोरेखित होत असते. काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्याने स्वतःपुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती एका विचाराची, एका चळवळीची आणि एका सामाजिक ध्येयाची ओळख बनतात. प्रा. डॉ. बळीराम पांडे हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. मराठवाड्याच्या मातीत घडलेले हे अभ्यासू प्राध्यापक, परिवर्तनवादी विचारांचे वाहक, साहित्यिक, कुशल संघटक आणि समाजप्रबोधनाचे अखंड प्रेरणास्त्रोत म्हणून आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावले आहेत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, जिद्द आणि ध्येयनिष्ठेचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. बालपणीचा "बळी" हा मुलगा शिक्षणाच्या बळावर, अथक परिश्रमाच्या जोरावर आणि संकटांशी झुंज देत उच्च शिक्षणाच्या शिखरावर पोहोचला. जीवनात आलेल्या अभावांनी त्यांना खचवले नाही; उलट प्रत्येक संकटाने त्यांना अधिक सक्षम, अधिक संवेदनशील आणि अधिक ...