हरिहर ऐक्य क्षेत्र परळी वैजनाथ "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषाने दुमदुमले

वैद्यनाथ नगरीत वारीचा आनंदसोहळा; संत गजानन महाराज पालखीचे उत्साहात स्वागत


हरिहर ऐक्य क्षेत्र परळी वैजनाथ "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषाने दुमदुमले

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

वैद्यनाथ नगरीत बुधवारी वारकरी भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याचे परळी शहरात आगमन होताच भाविकांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने स्वागत केले.

पालखी आगमनाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवर वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका फडकवत आणि "ज्ञानोबा-तुकाराम" तसेच "गण गण गणात बोते"च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. हरी-हर ऐक्याचे प्रतीक असलेल्या परळी वैजनाथ नगरीत वारकरी संप्रदायाच्या या आगमनाने भक्ती, समता आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

फुलांनी सजविलेल्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करत संत गजानन महाराजांना अभिवादन केले. शहरातील विविध संस्था, नागरिक आणि वारकरी मंडळांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

या सोहळ्यामुळे परळी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वारकरी परंपरेचा उत्साह आणि वैभव अनुभवण्याची संधी भाविकांना लाभली. पालखी मार्गावर शिस्तबद्ध व्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासन व पोलिस विभागानेही विशेष नियोजन केले होते.

गुलाब महाराज यांच्या पालखीचे स्वागत..

लडक्या विठोबारायाला भेटण्यासाठी राज्यभरातून अनेक दिंड्या पंढरीकडे कुच करत आहेत. कांही विदर्भातील दिंड्या मराठवाड्याच्या सिमेवर दाखल झाल्या आहेत. यात गुलाब महाराजांच्या पालखीचे ही मोठ्या प्रमाणात भाविक स्वागत करत आहेत. आज ही पालखी परळी शहरात दाखल झाली असता भाविकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले आहे.  पालखी संत जगमित्र नागा येथे विसाव्यासाठी थांबली असून दोन्ही पालख्या उद्या सकाळी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...