एक कोटी १० लाखाचा निधी मंजूर ; ग्रामविकास विभागाचा जीआर निर्गमित
ना. पंकजा मुंडेंमुळे परळी तालुक्यातील कौठळी, नंदनज, दौनापूर, डिग्रससह पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत
एक कोटी १० लाखाचा निधी मंजूर ; ग्रामविकास विभागाचा जीआर निर्गमित
परळी वैजनाथ दि. ०९
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्यामुळे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत मिळणार असून त्यासाठी एक कोटी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामविकास विभागाने तसा जीआर निर्गमित केला आहे.
ना. पंकजाताई मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत परळी तालुक्यातील ज्या गावांना ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत नाही अशांना स्वतंत्र इमारत द्यावी अशी शिफारस केली होती, त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार कौठळी (२५ लाख) नंदनज (२० लाख) डिग्रस (२० लाख) दौनापूर (२५ लाख) आणि परचुंडी (२० लाख) या ग्रा.प. ना निधी मंजूर झाला आहे, यातील परचुंडी ग्रामपंचायतीला यापूर्वी इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला असल्याने त्याऐवजी दादाहरी वडगाव ग्रा.पं.सुचविण्यात आली आहे, त्याचे शुध्दीपत्रक लवकरच निर्गमित होणार आहे. दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल संबंधित गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा