मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर शासन आदेश निर्गमित
ना.पंकजा मुंडे यांनी मानले आभार ; परळीतील नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला शासनाची १३ हेक्टर जमीन विनामूल्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर शासन आदेश निर्गमित मुंबई दि. २२ -- परळी येथे नव्याने होत असलेल्या पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय उभारण्यासाठी १३ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून तसा शासन आदेश महसूल व वन विभागाने निर्गमित केला आहे. दरम्यान या निर्णयाबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचे आभार मानले आहेत. परळीच्या सर्व्हे क्रमांक ४७८ मधील १३ हेक्टर शासकीय जमीन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या नियंत्रणाखालील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना 'भोगवटादार वर्ग-२' या अटीवर विनामूल्य व महसूलमुक्त स्वरूपात हस्तांतरित करण्यात येणार आहे. महसूल विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४० तसेच संबंधित नियमांनुसार ही जमीन प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. छत्रपती...