स्पर्धेचे आयोजक तथा भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे यांची माहिती...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी चित्रकला स्पर्धा
परळी वैजनाथ–
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिजामाता उद्यान, परळी वैजनाथ येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा दोन गटांत होणार असून, पहिल्या गटात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'रंग भरण' स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या गटात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण, जलसंवर्धन काळाची गरज, 'जल है तो कल है', स्मरणचित्र आणि पशुसंवर्धन या विषयांवर चित्रकला स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ₹5,000, द्वितीय क्रमांकासाठी ₹3,000 आणि तृतीय क्रमांकासाठी ₹2,000 अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.या स्पर्धेत परळी शहर व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक तथा भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा