कोल्हापूरच्या भव्य तैलिक समाज मेळाव्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; संगमेश्वर फुटके प्रदेश उपाध्यक्ष संजय बापू विभुते यांचा बीड जिल्ह्याच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत परळी वैजनाथ : प्रतिनिधी... कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य तैलिक समाज मेळावा होणार आहे, या मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर आप्पा फुटके यांनी केले आहे. कोल्हापूर येथे २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तैलिक समाजाचा भव्य मेळावा होणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना सांगली जिल्हाध्यक्ष (शिंदे गट) सन्माननीय संजय बापू विभुते परळी वैजनाथ येथे आले होते. बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर आप्पा फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा सचिव प्रा. मधुकर शिंदे यांनी संजय बापू विभुते यांचे स्वागत केले. तर परळी तेली युवक संघटनेचे अध्यक्ष पवनजी फुटके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना संज...