सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव!!!
संपादक बालासाहेब फड यांना ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार 2026’ जाहीर
परळी(प्रतिनिधी )
दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड यांना पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडत त्यांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लेखणी चालविल्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे.बालासाहेब फड यांनी आपल्या निर्भीड, निःपक्ष आणि जनहितवादी पत्रकारितेतून अनेक गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला तसेच सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली. प्रशासनापर्यंत जनतेच्या समस्या पोहोचवून अनेक प्रकरणांमध्ये सकारात्मक कार्यवाही घडवून आणण्यात त्यांच्या लेखणीचे मोठे योगदान राहिले आहे.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताची विविध कामे त्यांनी सातत्याने केली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला असून, या सन्मानामुळे पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर येथे आयोजित भव्य सोहळ्यात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वंजारी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार गोविंदरावजी केंद्रे हे प्रमुख उपस्थित राहणार असून, आमदार सुहास आण्णा कांदे (नांदगाव), आमदार मनोज कायंदे (शिंदखेडा राजा), वंजारी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती मोहन घुगे (गुजरात), कोंडाजी मामा आव्हाड, बुधाजी पानसरे, आमदार रत्नाकर गुट्टे, किशोर दराडे, विमलताई आव्हाड, शितलताई सागळे, राहुल जाधवर, हरिभाऊ गित्ते, शार्दुलराव जाधव, शोभाताई वर्के, योगिता नागरगोजे, कांचनकुमार चाटे आणि प्रमोद सांगळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
बालासाहेब फड यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि लोकहिताच्या कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर करण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे.या सन्मानाबद्दल बालासाहेब फड यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, मित्रपरिवार आणि समाजबांधवांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील पत्रकारिता व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा