पोस्ट्स

इमेज
१० ऑगस्टच्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परळीत एलईडी जनजागृती व्हॅनचे उद्घाटन परळी/ प्रतिनिधी... अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) विरोधात १० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचे उद्घाटन आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात करण्यात आले. या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधातील भूमिका, मोर्चाचे उद्दिष्ट तसेच समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. शहरासह ग्रामीण भागात ही व्हॅन फिरून जनजागृती करणार असल्याची माहिती मिळते आहे. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. १० ऑगस्ट रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक आणि व्यापक स्वरूपाचा करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

नगरसेविका अश्विनी केंद्रे व युवा नेते राहुल केंद्रे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार ...

इमेज
ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिरासतील पात्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगरला रवाना नगरसेविका अश्विनी केंद्रे व युवा नेते राहुल केंद्रे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-       महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा लोकनेत्या ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ. अश्विनी राहुल केंद्रे व युवा नेते राहुल रामचरण केंद्रे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना आज अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी नेत्रालयात शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.         आनंदऋषीजी नेत्रालय, अहिल्यानगर आणि अरिहंत जैन सेवाभावी संस्था, परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर, पद्मावती गल्ली येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आधुनिक संगणकीय...
इमेज
कोल्हापूरच्या भव्य तैलिक समाज मेळाव्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; संगमेश्वर फुटके   प्रदेश उपाध्यक्ष संजय बापू विभुते यांचा बीड जिल्ह्याच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत परळी वैजनाथ : प्रतिनिधी...     कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य तैलिक समाज मेळावा होणार आहे, या मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर आप्पा फुटके यांनी केले आहे.  कोल्हापूर येथे २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तैलिक समाजाचा भव्य मेळावा होणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना सांगली जिल्हाध्यक्ष (शिंदे गट) सन्माननीय संजय बापू विभुते परळी वैजनाथ येथे आले होते. बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर आप्पा फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा सचिव प्रा. मधुकर शिंदे यांनी संजय बापू विभुते यांचे स्वागत केले. तर परळी तेली युवक संघटनेचे अध्यक्ष पवनजी फुटके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना संज...
इमेज
कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात नशा मूक्तची शपथ परळी वैजनाथ,प्रतिनिधी...दि.३)ःयेथील लक्ष्मीबाई देशमुख महिला  महाविद्यालयामध्ये राष्टीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत यूवा कनेक्ट २.0 अंतर्गत नशा मुक्त भारत या साठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांना एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विवेकानंद कवडे यांनी शपथ दिली.  विकसित भारत यूवा कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण  करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या  स्वयंसेवकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संस्थेचे कोश्याध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख,  महाविद्यालयाच्या  प्राचार्या  डॉ विद्या देशपांडे,  प्रा. डॉ. देशपांडे , प्रा डॉ गुट्टे , प्रा. डॉ.  चव्हाण , प्रा. डॉ. दिग्रसकर , प्रा. डॉ. कुलकर्णी , राष्ट्रीय सेवा  योजना विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद कवडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,   प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
  ग्रामीण पोलीसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान चोरी पकडली; ; एकाला अटक करत मुद्देमाल जप्त  परळी वैजनाथ : प्रतिनिधी...      परळी ग्रामीण पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान चोरीच्या लोखंडी गजांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सुमारे २७ हजार किमतीचे १५ लोखंडी गज जप्त केले. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याचा एक साथीदार फरार झाला आहे.        पोलीस उपनिरीक्षक अंकुश निमोणे, पोलीस हवालदार उबाळे, पोलीस अंमलदार घोडके, पोलीस चालक वाघमारे हे गस्तीवर असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गस्त पथकाने सापळा रचून टाटा कंपनीचे वाहन (क्र. एमएच ४४/यू ०८८६) अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून २५ मिमी जाडीचे, २० फूट लांबीचे एकूण १५ लोखंडी गज (एकूण वजन सुमारे ४५० किलो) चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी  एकाला  वाहनासह ताब्यात घेण्यात आले....

गॅस एजन्सीच्या बाबतीत परळीकरांच्या वाढत्या तक्रारी...

इमेज
ऑनलाईन पैसे भरूनही घरपोच गॅस न दिल्याची तक्रार; गॅस वितरकावर कारवाईची मागणी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ गॅस डिस्ट्रीब्युटर (नाथ रोड) यांच्याकडून ऑनलाईन पैसे भरूनही घरपोच गॅस सिलिंडर न दिल्याचा आरोप करत ग्राहकाने तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित गॅस वितरकावर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. परळी वैजनाथ येथील रहिवासी तथा एचपी गॅसचे ग्राहक सचिन भांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी १४ जुलै २०२६ रोजी गॅस सिलिंडरचे ऑनलाईन बुकिंग करून संपूर्ण रक्कम भरली होती. कंपनीच्या नियमानुसार या रकमेत घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा शुल्काचाही समावेश असतानाही, संबंधित गॅस एजन्सीकडून सिलिंडर घरपोच देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ग्राहकाकडून पूर्ण पैसे स्वीकारूनही सेवा न देणे हे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील 'सेवेतील त्रुटी (Deficiency in Service)' तसेच 'अनुचित व्यापारी प्रथा (Unfair Trade Practice)' या प्रकारात मोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अत्यावश्यक ...

सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव!!!

इमेज
संपादक बालासाहेब फड यांना ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार 2026’ जाहीर परळी(प्रतिनिधी )      दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक  बालासाहेब फड यांना पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडत त्यांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लेखणी चालविल्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे.बालासाहेब फड यांनी आपल्या निर्भीड, निःपक्ष आणि जनहितवादी पत्रकारितेतून अनेक गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला तसेच सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली. प्रशासनापर्यंत जनतेच्या समस्या पोहोचवून अनेक प्रकरणांमध्ये सकारात्मक कार्यवाही घडवून आणण्यात त्यांच्या लेखणीचे मोठे योगदान राहिले आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताची विविध कामे त्यांनी सातत्याने केली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला असून, या सन्मानामुळे पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे ...