MB NEWS- BREAKING NEWS: *जाजुवाडी डीपीला भिषण आग;भीमवाडीसह अन्य परिसर अंधारात*(VIDEO)

 *जाजुवाडी डीपीला भिषण आग;भीमवाडीसह अन्य परिसर अंधारात*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    भीमवाडी परिसरात असलेल्या जाजुवाडी डीपीला भिषण आग लागली.अग्नीशामक विभागाने वेळीच ही आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.दरम्यान या आगीमुळे भीमवाडीसह अन्य परिसर अंधारात गेला आहे.

      मध्यरात्री सव्वा बारा ते साडेबाराच्या सुमारास महावितरणच्या जाजुवाडी डीपीने पेट घेतला असल्याचे दिसून आले.आगीचा डोंब प्रचंड उसळला होता.डीपीच्या अवतीभवती भंगार साहित्याचे ढीग आहेत त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले.वेळीच अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले व मोठा अनर्थ टळला आहे.

                        ⬛⬛ VIDEO ⬛⬛




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!