MB NEWS- *माझ्यासाठी धक्कादायक बातमी; रेखाताई परळीकर यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राची हानी - पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला शोक*

 *माझ्यासाठी धक्कादायक बातमी; रेखाताई परळीकर यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राची हानी - पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला शोक*



परळी । दिनांक १७।

प्राचार्य रेखाताई परळीकर यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.


रेखाताई परळीकर यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि धक्काच बसला. एक मनमिळाऊ आणि विद्यार्थी प्रिय असा त्यांचा स्वभाव होता. परळीतील शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते, त्यांचा आणि मुंडे कुटुंबाचा विशेष स्नेह होता, त्यांच्या निधनाने परळीच्या शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात शोक भावना व्यक्त करून पंकजाताई मुंडे यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार