इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-सेवाधर्म :ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीतील पाच गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार विवाह सहाय्य निधी वितरित!*

 *सेवाधर्म :ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीतील पाच गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार विवाह सहाय्य निधी वितरित!*



*परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

   सेवाधर्म: सारे काही समष्टीसाठी उपक्रमांतर्गत परळीतील पाच गरजु कुटुंबातील विवाह कार्यासाठी प्रत्येकी दहा हजार विवाह सहाय्य निधी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यामुळे कोरोनाच्या या कठिण काळात गरजू कुटुंबांना खुप मोठा मदतीचा हात मिळणार आहे.ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून होत असलेले सेवाकार्य खरोखरच लोकोपयोगी ठरत आहे.

          राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या कोविड प्रादुर्भावतील लोकोपयोगी उपक्रम "सेवाधर्म" या मध्ये आज परळीतील उषा अर्जुन पुजारी, सुनंदा प्रदिप रोडे, खाजा बी गौस शेख, बालासाहेब चिंचाणे, बलवीर आगळे या पाच गरजू कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी 10000 रुपये निधी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी गटनेते वाल्मिकअण्णा कराड,तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. गोविंद फड ,परळी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष सूर्यभान मुंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या