MB NEWS-परळीत चोरट्यांना अनलाॅक: घ्या आता..... कंडक्टर जवळील तिकीटाची मशिनच नेली चोरट्याने

 परळीत चोरट्यांना अनलाॅक: घ्या आता..... कंडक्टर जवळील तिकीटाची मशिनच नेली चोरट्याने  



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        परळीत गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे.कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत.बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना दि.१४ रोजी घडल्या आहेत. तर गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकलीही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. आता तर चोरट्यांना कशाची चोरी करावी याचे भान राहिल्याचेही दिसत नाही.परळी बसस्थानक येथुन कंडक्टर जवळील तिकीटाची मशिनच चोरट्याने चोरुन नेली असल्याचे पुढे आले आहे.

         याबाबतीत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बसवाहक (कंडक्टर) रामभाऊ आत्माराम बदाले हे दि.१४ रोजी गंगाखेड-परळी बसला कर्तव्यावर होते.बस क्र. एम एच ६ ७८६० बसस्थानकावर उभी होती. बस घेऊन जात असताना तिकीट मशिन क्र.जीकेडी ५०९६ किंमत १५००० रुपये गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.ह.मुजमुले हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !