MB NEWS-परळीतील 'रात्रीस खेळ चाले': दहशत माजवणार्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करावी-भाजयुमो

 परळीतील 'रात्रीस खेळ चाले': दहशत माजवणार्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करावी-भाजयुमो



परळी (प्रतिनिधी)..12 जून रोजी मध्यरात्री परळी शहरातील पंचवटी नगर,तळ परिसर,टॉवर परिसर,पद्मावती गल्ली,कृष्णा नगर,गणेश पार या भागांत जवळपास 35 ते 40 चारचाकी,दोन चाकी गाड्यांची तोडफोड करून गावगुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गावगुंडांनी वेगवेगळ्या भागांत केलेली दहशत सामान्य परळीतील नागरिकांना धडकी भरवणारी घटना आहे.

 या घटनेतील आरोपी तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा परळी च्या वतीने पोलीस उप अधीक्षक सुनील जायभाये साहेब यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.

  यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा परळीचे ऍड.अरुण पाठक, नितीन समशेट्टी,नरेश पिंपळे,अनिश अग्रवाल,पवन मोदानी,योगेश पांडकर,अश्विन मोगरकर,प्रल्हाद सुरवसे,गोविंद चौरे,वैजनाथ रेकने,दिलीप नेहरकर,श्रीपाद शिंदे,शाम गित्ते आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार