MB NEWS-परळी पंचायत समितीत नियमबाहय कामे व विकासात भेदभाव होत असल्याची तक्रार* *सरपंचांच्या शिष्टमंडळाने घेतली पंकजाताई मुंडे यांची भेट*

 *परळी पंचायत समितीत  नियमबाहय कामे व विकासात भेदभाव होत असल्याची तक्रार*


*सरपंचांच्या शिष्टमंडळाने घेतली पंकजाताई मुंडे यांची भेट*


परळी ।दिनांक १५। 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीत सर्रास नियमबाहय कामे करून बिलं काढण्याचा प्रकार होत आहे. शासकीय योजनांची कामे करतांना  भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतीवर जाणीवपूर्वक भेदभाव करून अन्याय केला जात असून याची चौकशी करण्याची मागणी विविध गावच्या सरपंचांनी केली आहे, यासंदर्भात सरपंचांच्या शिष्टमंडळाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. 

         राष्ट्रवादीकडून भाजपची कामे करतांना भेदभाव होत असुन याची मंत्रालय स्तरावर सखोल  चौकशी करून हा प्रश्न मार्गी लावावा  अशी मागणी सरपंचांनी केली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे तसेच सरपंच सर्वश्री विनायक गुट्टे, चंद्रकांत मुंडे, अतुल मुंडे, अशोक कदम, अनिल गुट्टे, सत्वशीला ढाकणे, गंगाधर सातपुते, ज्ञानोबा साबळे, राधाबाई साबळे, रामेश्वर कदम, कृष्णा सलगर, उर्मिला दहिफळे, पार्वती मुंडे, नवनाथ मुंडे, मनोहर देवकते, शिवराज मुंडे, राजेंद्र नागरगोजे, वैजनाथ कराड आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!