MB NEWS-*ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाला पंकजाताई मुंडे यांची उपस्थिती* 🕳️ _*मनोभावे केली यज्ञपुजा आणि आरती*_ 🕳️

 *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे  पवित्र कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाला पंकजाताई मुंडे यांची उपस्थिती*

🕳️  _*मनोभावे केली यज्ञपुजा आणि आरती*_  🕳️

* परळीवैजनाथ, प्रतिनिधी....

     बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक पर्वणीचा लाभ भाविक घेत आहेत. या नवकुंडी शतचंडी यागाला भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी उपस्थिती लावली व मनोभावे यज्ञकर्म,पुजा व आरती केली.

    धर्मशास्त्रात शतचंडी यागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कार्तिक माहात्म्य मोठ्या प्रमाणावर असून या पर्वणीत विविध धार्मिक विधी व साधनांना अतिशय महत्त्व आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला वक्रेश्वर मंदिर येथे दि. 12  नोव्हेंबरपासून या  याग सोहळा संपन्न होत आहे.१६ नोव्हेंबरपर्यंत हा सोहळा चालणार आहे. या सोहळ्यात भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी याठिकाणी उपस्थिती लावली व मनोभावे यज्ञकर्म,पुजा व आरती केली.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार