प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-आजचे राशिभविष्य :दि.१६ नोव्हेंबर २०२१

 आजचे राशिभविष्य :दि.१६ नोव्हेंबर २०२१

🌑 मेष-अनावश्यक खर्च होईल, परावलंबी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील, आळस सोडल्यास परिस्थिती सुधारेल, गैरसमज होतील, स्पर्धा, ईर्ष्या मनःस्ताप देतील.

🌑 वृषभ-मनासारख्या घटना घडल्यामुळे दिवस आनंददायी असेल, भरभराटीचा व लाभदायक दिवस ठरेल, वैवाहिक सौख्य उत्तम राहील, नव्या मित्रमंडळींची ओळख होईल.

🌑मिथुन-संकल्प पूर्णत्वाकडे जातील, मेहनत व चिकाटीला यश येईल, जबाबदारी वाढेल, अधिकारात वाढ होईल, गृहसौख्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील.

🌑 कर्क-जुने रोग उद्भवतील, सरकारी कामांत अडचणी येतील, प्रतिकारशक्ती कमी होईल, अचानक खर्च उभे राहतील, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.

🌑सिंह-पूर्वनियोजित कामांत अडचणी येतील, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, आत्मविश्वास कमी करणार्‍या घटना घडतील, दमा, मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका.

🌑कन्या-प्रेम-प्रणयाचा अनुभव येईल, चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल, प्रवासाचे योग, प्रतिष्ठा लाभेल, कौटुंबिकदृष्ट्या सौख्यकारक दिवस जाईल.

🌑तूळ-आरोग्य उत्तम राहील, आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरेल, शत्रूपीडा कमी होईल, सज्जन मित्रमंडळींची ओळख होईल, सौख्यकारक दिवस जाईल.

🌑वृश्चिक-दुःखद घटनांचा अनुभव येईल, मनाविरुद्ध घटना घडतील, कामांत अडचणी येतील, संभ्रमावस्था राहील, अचानक खर्च उभे राहतील, प्रतिष्ठा पणाला लागेल.

🌑धनु-अनावश्यक भीती आत्मविश्वास कमी करेल, पोटासंबंधित व्याधी निर्माण होतील, कौटुंबिक अस्वास्थ्य राहील, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, वादविवादापासून दूर राहा.

🌑मकर-चुरशीच्या कामांत जय प्राप्त कराल, पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत लाभ होतील, उत्तम वस्त्रांची खरेदी कराल, मैत्रीला जागाल, जिवलगांचा सहवास लाभेल.

🌑कुंभ-आर्थिक अडचणी निर्माण होतील, कर्जदार तगादा लावतील, मानहानीचे प्रसंग मनःस्ताप देतील, नुकसानकारक दिवस जाईल, सतर्क रहा.

🌑मीन-भाग्यकारक घटनांमुळे प्रसन्नता प्राप्त होईल, सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल, उंची वस्त्र व अलंकारांचा लाभ होईल, सुवार्ता ऐकायला मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या