MB NEWS-कार्तिक पौर्णिमा व कपीलधार यात्रा : परळीत वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजला ; दर्शनासाठी मोठी गर्दी

 कार्तिक पौर्णिमा व कपीलधार यात्रा :  परळीत वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजला ; दर्शनासाठी मोठी गर्दी

परळी वैजनाथ / प्रतिनिधी. ....

         कार्तिक पोर्णिमेनिमित्त व मन्मथस्वामी कपीलधार यात्रेच्या पार्श्वभूमीवर  परळीत वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजला  आहे.वैद्यनाथाच्या  दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे. बर्याच दिवसांनी वैद्यनाथ मंदिर परिसरात यात्रावजा चित्र बघायला मिळत आहे.

        कार्तिक पोर्णिमेनिमित्त हर हर महादेव, श्री संत मन्मथ स्वामी महाराज की जय, असा जयघोष करत कपिलधार यात्रेचे  हजारों भाविकांनी श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. या पार्श्वभूमीवर वैद्यनाथाच्या पायर्‍यासमोर प्रसाद साहित्याच्या थाटलेल्या दुकानांची लगबग सुरू झाली आहे.  वैद्यनाथ मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले आहे. सकाळ पासुनच दर्शनासाठी भक्तांची रिघ लागली होती. बीड तालुक्यातील कपिलधार येथील श्री संत मन्मथस्वामींची मोठी यात्रा भरते. परळी मार्गे हे भाविक  प्रवास करतात. दरवर्षी या यात्रेदरम्यान यात्रेपुर्वी व यात्रेनंतर चार दिवस असा आठवडाभरात मोठी गर्दी परळीत होते. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार