प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-नंदनज येथे बाळकृष्ण महाराज वसंतगडकर (सातारा), प्रभाकर महाराज झोलकर यांच्या किर्तनाचे आयोजन

 नंदनज येथे बाळकृष्ण महाराज वसंतगडकर (सातारा), प्रभाकर महाराज झोलकर यांच्या किर्तनाचे आयोजन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नंदनज येथील सौ.पंचफुलाबाई पंढरीनाथ आघाव यांच्या गोडजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त दि. 19  नोव्हेंबर रोजी किर्तन महोत्सव होणार असून तरी किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आघाव कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

       तालुक्यातील नंदनज येथील बाबुराव पंढरीनाथ आघाव व जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव यांच्या मातोश्रींच्या गोडजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.   कार्तिक पोर्णिमा शुक्रवार दि.19.रोजी दुपारी 1 ते 3 वाजता संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर (सातारा) तसेच रात्री 8 ते 10.वाजता वैराग्यमुर्ती ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर  यांचे किर्तन होणार आहे.

    बीड जिल्हासह परळी तालुक्यातील व शहरातील तसेच पंचक्रोशीतील  ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी बाळकृष्ण महाराज वसंतगढकर, प्रभाकर महाराज झोलकर यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी नंदनज येथे उपस्थित रहावे असे आवाहन  पंढरीनाथ वामनराव आघाव,बाबुराव पंढरीनाथ आघाव व जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव व आघाव परिवार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या