संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

MB NEWS- ⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.१८ नोव्हेंबर २०२१*

  ⬛ आजचे राशिभविष्य ⬛

     *दि.१८ नोव्हेंबर २०२१*

                       

मेष – स्वप्नपूर्तीचा दिवस. अनपेक्षितपणे लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. लोकसेवा कराल. प्रसन्नता प्राप्त होईल.


वृषभ – कर्जदार तगादा लावतील. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. ध्येयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. दवाखान्यासाठी खर्च होईल.


मिथुन – व्यावसायिकांना धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल.


कर्क – मनासारख्या घटना घडतील, प्रेरणादायी कार्य कराल, लोकांना सहकार्य कराल, प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, केलेल्या कामाचे कौतुक होईल.


सिंह – गैरसमजातून वादविवाद होतील. संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अस्वस्थता राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. अशक्तपणा जाणवेल.


कन्या – प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. मध्यस्थी करू नका. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस.


तूळ – मंगलकार्यात सहभाग घ्याल. भागीदारीत लाभ होईल. छोटे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.


वृश्चिक – जवळचे लोक सहकार्य करतील. नोकरी करणार्‍यांना लाभदायक दिवस ठरेल. पदोन्नतीचे योग संभवतात. शत्रू पीडा कमी होईल.


धनु – सट्टा, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात अपयश येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे.


मकर – कौटुंबिक कलह टाळा. अनावश्यक खर्च होतील. वाहने सावकाश चालवा. वास्तुसंबंधित कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. अचानक खर्च उभे राहतील.


कुंभ – साहस यशाकडे घेऊन जाईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल. कलागुणांना वाव मिळेल. लाभदायक दिवस.


मीन – क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. संयम आवश्यक आहे. वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....