इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळीत श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव उत्साहात होणार;30 ऑगस्टला प्रारंभ

 परळीत श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव उत्साहात होणार;30 ऑगस्टला प्रारंभ 



*शिवनाम सप्ताह, पालखी सोहळयाचे आयोजन; श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची लाभणार उपस्थिती*


*परळी/प्रतिनिधी*


श्री गुरूलिंग स्वामी संस्थान (बेलवाडी) च्या विश्वस्त मंडळाची बैठक आज बुधवार दि.3 ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत कोरोना संसर्ग लॉकडाऊनमध्ये बंद असलेला श्री गुरूलिंगस्वामी पुण्यतिथी महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 30 ऑगस्टपासून उत्सवाला सुरूवात होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा असे सर्व पारंपारिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहेत.


मागील दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे होवू न शकलेला श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव यावर्षी विविध सामाजिक, धार्मीक उपक्रम व पारंपारिक भंडारा कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. बेलवाडी येथे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. सप्ताहात अखंड शिवनाम, श्री गुरूलिंग स्वामींचा पालखी महोत्सव, कीर्तन, प्रवचन आदी धार्मीक कार्यक्रम श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रतिवर्षी होणारा उत्सव मागील दोन वर्ष होवू न शकल्याने समाज बांधवाकडून यावर्षी अधिक मोठा उत्सव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. याला अनुसरूनच आज झालेल्या बैठकीत अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय घेवून यावर्षी उत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी,सचिव अ‍ॅड.गिरीषअप्पा चौधरी, सदस्य प्रा.राम काटकर, रत्नेश्वरअप्पा कोरे, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे, शिवकुमारअप्पा व्यवहारे, शंकरअप्पा उदरगीरकर, शिवशंकरअप्पा निर्मळे, अक्षय मेनकुदळे, अ‍ॅड.मंदार नरवणे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या