MB NEWS-"तो" तरंगता मृतदेह हाळंब येथील युवकाचा

 "तो" तरंगता मृतदेह हाळंब येथील युवकाचा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        परळी येथील हरिहर तीर्थामध्ये काल दि.2 रोजी सायंकाळी एक  मृतदेह आढळला घटनेची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन  घटनेचा पंचनामा केला. या मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत पोलीसांनी प्रक्रिया पूर्ण केली.हा मृतदेह हाळंब येथील युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.



       परळी तालुक्यातील हाळंब येथील 21 वर्षीय युवक संभाजी प्रभाकर गुट्टे वय 21 वर्ष राहणार हाळंब अशी माहिती समोर आली. वैद्यनाथ मंदिर पाठीमागील बाजूचा असलेले हरिहर तीर्थ सध्या पावसाळ्याने तुडुंब भरले असून यात भरपूर पाणी आहे.येथे अनेक जण श्रावण महिन्यामध्ये स्नानासाठी सुद्धा येत असतात त्यावेळी अचानकपणे पाय घसरून मध्ये पडण्याची ही घटना घडतात परंतु या घटनेत नेमके काय घडले असावे याच्या बाबतीत पोलीस  घटनेचे सीसीटीव्ही फुटेज द्वारा माहिती घेत आहे.


●संबंधित बातमी:● *परळीत आढळला तरंगता मानवीदेह.* _|MB NEWS |Subscribe |Like |share |comments_



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार