MB NEWS-धर्मापुरी फाटा रस्ता बनला परळीचा जलमार्ग

 धर्मापुरी फाटा रस्ता बनला परळीचा जलमार्ग



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      परळी-गंगाखेड रस्त्यावरील धर्मापुरी फाट्यावरून संपूर्ण रस्ता नेहमीच जलमय असल्याचे चित्र दिसून येते. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून मोठ्याप्रमाणात तुंबुन बसते. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी अक्षरश:पाण्यातून होत आहे. वाहनधारकांना मात्र यामुळे चांगल्याच अव्यवस्थेला सामोरे जावे लागत आहे.


    धर्मापुरी फाट्यावरील रस्त्यावर थोडाही पाऊस झाल्यानंतर रस्ता जलमय होऊन जातो.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून बसते.एखादाही पाऊस झाल्यानंतर पुढचे अनेक दिवस या रस्त्यावर पाणी राहते.रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्याय शिल्लक राहिलेला नाही.या रस्त्यावरील पाण्याला जायला वाट नाही.रस्त्यावरील दोन्ही बाजूस पाणी वाहून जाण्यास नाल्या शिल्लक राहिलेल्या नाहीत. यामुळे चांगला रस्ता असुनही पाणी साचून बसत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !