MB NEWS-तारीख पे तारीख.....आता सोमवारी निर्णय

 तारीख पे तारीख.....आता सोमवारी निर्णय



 
     शिवसेना कोणाची ? बंडखोर आमदार अपात्र ठरणार का ? विधानसभा अध्यक्षांना नेमके काय अधिकार आहेत? या प्रश्नावर आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील सोमवार 8 ऑगस्ट ही तारीखहे प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आदेश दिले.
         त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.आता शिवसेना कोणाची अन धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल असेही न्यायालयाने म्हटले आहे.मात्र सध्या कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई करू नये असेही न्यायालयाने म्हटले आहे.आता या सगळ्या याचिकांवर सोमवारी सुनावणी होईल.

         सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहचलेला राज्यातील सत्ता संघर्ष गुरुवारी कोणाकडे झुकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.बंड केल्यानंतर मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या एकनाथ शिंदे यांनी 16 आमदारांना अपात्र करण्याच्या कारवाई बाबत न्यायालयात धाव घेतली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !